top of page

आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सामील होणार; आज भारत जोडो यात्रेत दिसणार...

ree

मुंबई- काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रातील पाचवा दिवस आहे. चार दिवस नांदेड जिल्ह्यात मार्गक्रमण केल्यानंतर आज पाचव्या दिवशी ही यात्रात हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या यात्रेवेळी आज राज्यात ऐतिहासिक चित्र पाहायला मिळणार आहे. कारण काँग्रेसच्या या यात्रेत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे सहभागी होणार आहे. गांधी आणि ठाकरे कुटुंबाची नवी पिढी यानिमित्ताने पहिल्यांदाच जाहीरपणे एकत्र येणार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणाने अनपेक्षित वळण घेतलं आणि शिवसेनेनं भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिवसेना-भाजपमधील दरी वाढतच गेली आणि दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले चढवू लागले. तसंच केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांवर होत असलेल्या कारवायांमुळे भाजपसोबत राजकीय संघर्ष आणखीनच टोकदार झाला आहे. अशातच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकर यांची भेट घेत या यात्रेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं. या पार्श्वभूमीवर आज आदित्य ठाकरे हिंगोली जिल्ह्यात या पदयात्रेत राहुल गांधींसोबत चालणार आहे.

शुक्रवार ११ नोव्हेंबर
स. ५.४५ वा. दाभड पदयात्रा प्रारंभ
स. ६.०० वा. भोकर फाटा
स. ६.०० वा. वसमत फाटा
स. ७.०० वा. तहसील कार्यालय कॉर्नर, अर्धापूर
स. ७.१५ वा. तामसा कॉर्नर, अर्धापूर
स. ७.३० वा. बसस्थानक, अर्धापूर
स. ८.३० वा. पार्डी मक्ता
स. ९.०० वा. स्वामी फार्म हाऊस, पार्डी मक्ता
दु. ३.०० वा. चोरांबा फाटा पदयात्रा प्रारंभ
दु. ३.३० वा. हिवरा फाटा
दु. ३.३० नंतर हिंगोली जिल्ह्यात प्रवेश

दरम्यान, राहुल गांधी यांची 'भारत जोडो' यात्रा राज्यातील प्रवासाच्या चौथ्या दिवशी गुरुवारी नांदेड शहरात पोहोचली होती. दिवसभराच्या पदयात्रेनंतर सायंकाळी नवा मोंढा येथील मैदानावर राहुल गांधी यांची सभा झाली. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी ३० मिनिटांच्या भाषणात राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page