Search
राज्यात कायम संततधार; कोयना धरणातून विसर्ग...
- MahaLive News
- Aug 12, 2022
- 1 min read

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलेला आहे. अनेक जिल्ह्यांना पुन्हा झोडपून काढलेलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्यासारखा पाऊस पडताना दिसत आहे. तर, हवामान खात्याकडून (IMD Alert) हे पुढचे काही तास पावसाचे राहणारा असल्याचा इशारा देण्यात आलाय. मुंबईतही पावसाच्या कोसळधारा सतत सुरूच आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कोकणालाही पावसानं चांगलंच झोडपून काढलंय.
Comments