top of page

गणपतीसणाच्या तोंडावर एसटी कर्मचारी पुन्हा संपावर जाणार...


ree

नुकतेच मुंबईच्या बेस्ट सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप केला हेतो. पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेतला होता. पण आता ऐन गणपती सणाच्या तोंडावर पुन्हा एसटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेने प्रलंबित आर्थिक मुद्द्यांच्या सोडवणुकीसाठी 11 सप्टेंबरला संपाची हाक दिली.


एसटी कर्मचारी हे पगार वाढ, पदोन्नती आणि अन्य मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपासले आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर 13 सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यातील आगार कर्मचारी काम बंद करून उपोषणाला बसणार असून, छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र एसी कामगार संघटनेच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. हे कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण करतील. सरकारने ऐकले नाही तर 13 सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक आगारात कर्मचारी काम बंद करून उपोषण करणार आहेत.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी शिवारात आढळली साडेआठ फुटाची अंदाजे 100 किलोची मगर.
bottom of page