Search
"काँग्रेसचे अनेक आमदार अजित पवारांच्या संपर्कात" लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश...
- MahaLive News

- Jul 10, 2023
- 1 min read

महालाईव्ह न्यूज । राज्यातल्या राजकीय उलथापालथीनंतर अजित पवार गटाने आता वेगवेगळे गौप्यस्फोट करायला सुरुवात केली आहे. यातच मंत्री अनिल पाटलांनी "काँग्रेसचे अनेक आमदार हे अजित पवार व सुनील तटकरेंच्या संपर्कात आहेत व बहुतांश लोक हे राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहेत." असा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनीही काँग्रेसचे अनेक आमदार हे अस्वस्थ असून बाहेर पडण्यास तयार आहेत, असे विधान केले होते. काँग्रेसचे काही नेते अजित पवार यांच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा प्रवेश होईल, असं वक्तव्य अजित पवार गटाचे युती सरकारमधील मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केलं आहे. मंत्री अनिल पाटील यांच्या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे.























Comments