नुकसानीचे पंचनामे सुरु असतानाच ३६ तहसिलदारांच्या बदल्या...
- MahaLive News
- Mar 10, 2023
- 1 min read

राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकसानीचे पंचनामे सुरु असतानाच ३६ तहसिलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील 13 हजार 729 हेक्टरील पिकांचे नुकसान अवकाळी पावसामुळं झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सभागृहात दिली होती. तसेच अवकाळी पावसामुळं गहू, ज्वारी, हरभरा, मका, द्राक्ष, आंबा, पपई, संत्रा या पिकांचं नुकसान झाले असून, तत्काळ नकसानग्रस्त भागाची माहिती शासनानं मागितली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितलं. याचदरम्यान राज्यातील 36 तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या मुद्यावरुन विरोधक सभागृहात आक्रमक होत शिंदे फडणवीस सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
Comments