कोणत्या सरकारच्या काळात किती शेतकरी आत्महत्या? अजित पवारांनी सांगितली आकडेवारी...
- MahaLive News
- Mar 10, 2023
- 1 min read

मुंबई- शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पेटताना दिसत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा मांडला आहे. तसंच कोणाच्या सरकारच्या काळामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, याविषयी माहिती दिली आहे.
अधिवेशनात बोलताना अजित पवार म्हणाले, "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१४ ते २०१९ पर्यंत पाच वर्षात ५०६१, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना २०१९ ते २०२१ या अडीच वर्षात १६६० तर एकनाथ शिंदे आल्यापासून फक्त सात महिन्यांमध्ये १०२३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मला तुलना करायची नाही. पण कोणत्याही सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या होणे वाईट आहे." ते पुढे म्हणतात, 'कोणत्याच मुख्यमंत्र्याला असं वाटत नाही की, आपल्या काळात शेतकऱ्यांनी आत्महत्या काराव्यात. पण, यातून काहीतरी ठोस मार्ग काढण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी ही आकडेवारी अगदी बोलकी आहे. पीक कर्ज नाही, विम्याची आणि सरकारची मदत नाही. अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत.' 'आजही दररोज सरासरी 8 शेतकरी आत्महत्या करत आहे. मराठवाड्यात गेल्या दोन महिन्यात 62 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, तर एकट्या बीड जिल्ह्यात 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यावेळी म्हणायचे की, 302 चा गुन्हा दाखल करा. मात्र 302 चा गुन्हा दाखल करून उपयोग नाही. शेतकरी आत्महत्या थांबण्यासाठी योग्य मार्ग काढण्याची गरज आहे. यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा,' असंही ते म्हणाले.
ठोस मार्ग काढणं गरजेचं आहे, असं सांगताना अजित पवार म्हणाले, "शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी ही आकडेवारी अगदी बोलकी आहे. दररोज ८ शेतकरी आत्महत्या करत आहे. बीडमध्ये २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यावेळी मी भाषण ऐकायचो की ३०२ चा गुन्हा दाखल करा. मात्र ३०२ चा गुन्हा दाखल करून उपयोग नाही तर मार्ग काढला पाहिजे."
Comments