स्थानिक गुन्हे शाखाची कामगिरी; 5 मोटारसायकली जप्त, एकूण 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...
- MahaLive News
- Jan 10, 2023
- 2 min read

लातूर- पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ .अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर श्री.जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री.गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात लातूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला दाखल असलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके तयार करून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.
पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषता मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते .त्या अनुषंगाने सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 08/ 01/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, नवीन रेणापूर नाका, रेल्वे स्टेशन परिसरात चोरीच्या मोटारसायकली खरेदी व विक्रीचा व्यवहार होणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथकाने रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लावून चोरीच्या मोटरसायकल खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरात फिरणारा बातमी मधील इसमला ताब्यात घेण्यात आले. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्यांचे नाव मुकेश वामन गायकवाड वय 28 वर्ष राहणार हंचनाळ तालुका निलंगा जिल्हा लातूर. असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे आणखीन सखोल विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, लातूर शहरातील विविध ठिकाणाहून तसेच जिल्ह्या बाहेरून मोटारसायकली चोरी करून एकत्र लपवून ठेवतात व एकदाच विकतात असे सांगितले.
पोलीस चौकशी मध्ये त्याचे कडून एकूण पाच मोटारसायकली ज्याची किंमत 1 लाख 50 हजार रुपयांछा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जप्त केलेल्या मोटारसायकली संदर्भाने लातूर जिल्ह्यात 4 गुन्हे, पुणे जिल्ह्यात 1 गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्ह्यातील मोटरसायकली जप्त करण्यात आलेले आहेत तसेच पुढील कायदेशीर कारवाई करिता नमूद जप्त मुद्देमाल व आरोपी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे यांचे मार्गदर्शनात सपोनी सचिन द्रोणाचार्य, पोलीस अमलदार अंगद कोतवाड, माधव बिल्लापट्टे, राजू मस्के, राजेश कंचे, जमीर शेख, नितीन कठारे, प्रदीप चोपणे यांनी पार पाडली.
Comments