महालाईव्ह न्युज; सर्वात महत्वाच्या बातम्या @ १० AM । ११-मे-२०२१ । Mahalive News
- MahaLive News
- May 11, 2021
- 7 min read

आपल्या जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या साठी जिल्ह्यावर क्लिक करा... लातूर यतमाळ उस्मानाबाद परभणी बुलढाणा जळगाव कोल्हापूर सातारा सांगली धुळे ठाणे पुणे नागपुर नाशिक सोलापूर मुंबई जालना बीड औरंगाबाद अमरावती अकोला ● राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती, सामान्य प्रशासन विभागाचा आदेश... ● महाराष्ट्रासह 14 राज्यांना 'कोव्हॅक्सिन'चा थेट पुरवठा; भारत बायोटेकच्या संचालिकांची माहिती... ● राज्यातील पहिला म्युकोरमायकोसिस रुग्ण ठाण्यात आढळला, कोरोनाग्रस्त महिलेला लागण... ---------------------- महालाईव्ह वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ९०९६५०९७७७ ---------------------- ● अमेरिकेकडून भारताला 50 कोटी डाॅलरची मदत, मोदी-बायडेन चर्चेनंतर अवघ्या पंधरा दिवसात मिळाला दिलासा...
● आधी स्वत:ला सांभाळा, मग लोकांना मदत करा; नितीन गडकरींचा नेते, कार्यकर्त्यांना सल्ला...
लातूर
● ठप्प झालेले लसीकरण मंगळवार, दि. ११ मे रोजी जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली... ● जिल्ह्यात गेल्या २४ तासात ६९६ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८८२ जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत.... ● लातूर येथील जुना औसा रोड भागातील सद्गुरूनगरमध्ये एका अपार्टमेंटमधील घर चोरट्यांनी फोडून २ लाख २ हजार ५०० रुपयांचे ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
यतमाळ
● जिल्ह्यात गेल्या 24 तासात 815 जण पॉझेटिव्ह आले असून 1010 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे... ● कोरोना चाचणी निगेटीव्ह असेल तरच बँकेत या; पांढरकवडा स्टेट बॅकेचा फतवा... ● अनाठायी एका महिलेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ३६ तास ताटकळत राहिला. तिरडीला खांदा देण्यासाठी कोणीही पुढे आले नाही...
उस्मानाबाद
● जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट सुरूच; दिवसभरात 833 रुग्णांची नोंद... ● 12 मे पासून जिल्ह्यात जीवनावश्यक सेवा दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू : जिल्हाधिकारी... ● कोविडची तिसरी लाट सक्षमपणे थोपवून परत लावण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा : राज्यमंत्री बनसोडे... ● कळंब येथील कोविड सेंटरला खासदारांची भेट ...
परभणी
● जिल्ह्यातील रुग्णसंख्येत मोठी घट; 374 रुग्णांची नोंद; आठ जणांचा कोरोनाने मृत्यू; तब्बल दोन महिन्यानंतर रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने नागरिकांना दिलासा... ● जिल्ह्यात रुग्णांना आढळली म्युकरमायकोसिसची लक्षणे; तीन रुग्णांना म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळली असून, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला ... ● बाजार समितीच्यावतीने शहरातील वालूर रस्त्यावरील अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहात उभारलेल्या कोरोना केअर सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आले असता जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले कोविड सेंटरवर जेवण... ● जिंतूर : शहरी भागात असणारा कोरोना आता ग्रामीण भागातही फोफावत असून 30 ते 35 टक्के रुग्ण संख्या ही चिंताजनक बाब आहे, त्यामुळे सर्वांनी आता काळजी घेण्याची गरज : जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर... ● जिल्हा सीमेवरील नाक्यावर सव्वा लाखाचा गुटखा पकडला; पथकाने कार, गुटखा व रोख रक्कम केली जप्त...
बुलढाणा
● असंघटित व अनोंदणीकृत अन्न प्रक्रिया उदयोगासाठी सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेचा लाभ घ्यावा : कृषी विभागाचे आवाहन... ● अंनिस करणार फसव्या विज्ञान विरोधात जागर; चार दिवसीय ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन... ● देयके तपासल्याशिवाय रुग्णांकडून बिल घेऊ नका : डॉ. राजेंद्र शिंगणे... ● देऊळगाव राजा नगरपालिकाच्या कचरा उचलणाऱ्या सहा गाड्यांच्या बॅटऱ्याची चोरी... ● कोरोनाच्या गंभीर रुग्णाला 41 हजार रुपयांचे अत्यावश्यक इंजेक्शन प्रशांत पाटील यांनी दिले स्वखर्चातुन... ● बुलडाण्याच्या चेतना नगरात भरदिवसा घरफोडी; पाच लाखाचे दागिने लंपास...
जळगाव
● मांडवे बुद्रुक येथील ५७ वर्षीय शेतकऱ्याने विषप्राशन करून आपले आयुष्य संपविले; शांताराम वामन जाधव आसे मयत शेतकऱ्याचे नाव ... ● गोंडखेल शिवारात तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या... ● परीक्षा शुल्कात २५ टक्के सवलत देण्याचा निर्णय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने घेण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्टुडंट युनियनतर्फे देण्यात आली आहे...
कोल्हापूर
● लहान मुलांवरील उपचारासाठी व्हेंटिलेटरची व्यवस्था ठेवा : हसन मुश्रीफ... ● जिल्ह्यातील आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ६१ कोरोनाग्रस्तांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला आहे... ● औषधांच्या नावाखालील गर्दी टाळण्यासाठी वडगाव पोलीस ठाणा हद्दीतील गावांमध्ये मोफत घरपोहोच औषधे देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला .... ● मद्यप्राशन करून नशेत भरधाव कार चालवून पोलीस जीपसह एकूण पाच वाहनांना धडक देऊन महिलेस जखमी केल्याचा प्रकार घडला होता. त्याप्रकरणी कारचालक सचिन अशोक जिरगे (वय ४६, रा. कुसूम अपार्टमेंट, युनिक पार्क, कदमवाडी) याच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद...
सातारा
● जिल्ह्यात दिवसभरात 2280 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 30 बाधितांचा मृत्यू... ● चित्रीकरण बंद झाल्यामुळे जिल्ह्याला सुमारे 300 कोटींचा फटका... ● नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह धुवांधार पावसामुळे घाटमाथ्यावरील वर्धन ॲग्रो कारखान्याचे जाॅगरी पावडर साठवण करण्यासाठी उभारलेले गोदाम भुईसपाट ... ● शाहूपुरी परिसरातील अनेक ठिकाणचे विद्युत ट्रान्स्फार्मर उघड्या अवस्थेत असल्याने त्यामुळे अपघात होण्याचा धोका ... ● सातारा : विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या दहा जणांवर शहर व शाहूपुरी पोलिसांनी केली कारवाई ... ● नायगाव (ता. खंडाळा) येथे 8 वर्षीय चिमुरड्याचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली ...
सांगली
● जिल्ह्यात आजअखेर 92 हजार 92 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 72 हजार 422 रुग्ण कोरोनामुक्त; सद्यस्थितीत उपचाराखाली 16 हजार 992 रूग्ण... ● कोरोना बाधित रूग्णांची साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेशांना 15 मे पर्यंत मुदतवाढ : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी... ● खरीप हंगामासाठी खते, बी-बियाणांचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी नियोजन करणार : पालकमंत्री जयंत पाटील... ● सांगली : कोरोना लस आल्याच्या पहिल्या दिवशी 16 हजार नागरिकांचे लसीकरण झाले, दरम्यान, 45 वर्षांवरील लाभार्थ्यांसाठीची लस संपली असून, मंगळवारी फक्त 18 ते 44 वयोगटासाठीचे लसीकरण सुरू राहणार ... ● वाळवा तालुक्यातील इस्लामपूर,आष्टा, कासेगाव, कुरळप येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी अशा 315 जणांना मास्क, सॅनिटायझर व सन्मानपत्राचे वाटप ... ● कुपवाड : लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शिंदे मळा येथील माळी बेकरी व फळ विक्रेत्याकडून महापालिका प्रशासनाने 50 हजारांचा दंड केला वसूल...
धुळे
● दोन दिवसांसाठी 20 हजार डाेस प्राप्त; शंभर केंद्रांत मिळेल लस; जिल्ह्यात मिळाली 2 लाख 32 हजार नागरिकांना लस... ● घराची भिंत कोसळल्याने दोन महिला जखमी; शिरपूर तालुक्यातील तोंदे येथील घटना... ● जुगार खेळावर थाळनेर पोलिसांचा छापा; 19 जणांविरुध्द गुन्हा दाखल... ● बनावट दारु बनवणारे साधन सामुग्रीसह 3 लाख 92 हजाराचा मुद्देमाल केला जप्त; सोनगीर पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात... ● मर्चंट बँकेविरुध्द बातमी लावल्याचा राग आल्याने पत्रकार ईश्वर बोरसे यांना धमकी; गुन्हा दाखल...
ठाणे
● भिवंडीतील शेलार ग्राम पंचायत उभारणार ५० खाटांचे कोविड सेंटर... ● धोका वाढला! म्युकरमायकोसिस मुंबईच्या वेशीवर पोहोचला; ठाण्यात पहिल्या रुग्णाची नोंद... ● लॉकडाऊन रद्द न झाल्यास शिवसेना उतरणार रस्त्यावर, वामन म्हात्रे यांचा इशारा... ● बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून, व्यावसायिकाला लाखोंना लुटले, मॉडेल आणि तिच्या मित्रावर खंडणीचा गुन्हा...
पुणे
● पुणे शहरात दिवसभरात 1165 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ; पुणे शहरात दिवसभरात 4010 रुग्णांना डिस्चार्ज... ● जिल्हयात बालविवाह होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि बालविवाह लक्षात आल्यास त्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या ... ● पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 21 हजार 159 रुग्णांपैकी 8 लाख 10 हजार 447 रुग्ण बरे होवून घरी परतले; विभागीय आयुक्त सौरभ राव यांची माहिती ... ● जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, सहकार तज्ज्ञ माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, ते 89 वर्षांचे होते; ते बारामती येथील निंबूत गावातील शेतकरी कुटुंबातील होते... ● एक टिपका पाणीही सोलापूरचं घेणार नाही, मात्र इंदापूरला ही पाणी कमी पडू देणार नाही, अशी प्रतिक्रिया जलसंधारण राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री व इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिलीय ... ● मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षण रद्द केल्याने पुण्यात अजित पवार यांच्या घरावर भीम आर्मी आझाद समाज पार्टीच्यावतीने आंदोलन करण्यात आले ...
नागपुर
● शेतात जाण्याच्या रस्त्याच्या वादातून आराेपी पती-पत्नीने दाेघांना मारहाण करीत जखमी केले. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील जांभळापाणी शिवारात घडली... ● एमडी तस्करीत सहभागी असलेल्या गुन्हेगारांच्या विरोधात नागपूर पोलिसांनी सोमवारी मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. एकाच वेळी ३२ गुन्हेगारांच्या घरी धाडी टाकल्या... ● आधी स्वत:ला सांभाळा, मग लोकांना मदत करा; नितीन गडकरींचा नेते, कार्यकर्त्यांना सल्ला... ● दुसऱ्या पतीने संबंध नाकारलेल्या पत्नीला गर्भपाताची परवानगी :उच्च न्यायालयाचा दिलासा ...
नाशिक
● शहरात पुन्हा 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन; भाजीपाला, वैद्यकीय सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे आदेश ... ● शिवसेना उत्तर महाराष्ट्र महिला संघटक सत्यभामा गाडेकर यांचे कोरोनाने निधन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून गाडेकर कुटुंबियांचे सांत्वन ... ● नायकवाडी धरणाचा पाणीसाठा वाढविण्यासाठी 2500 हजार ट्रक गाळ काढणार; गिरणारे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना होणार गाळाचा फायदा ... ● पाच महिन्यात शहरातील 79 सराईत गुन्हेगारांवर मोक्क्याची कारवाई; गुंडाच्या टोळ्यांनी घेतला आयुक्त दीपक पांडेय यांच्या कारवाईचा धसका ... ● ग्रामीण भागात कोरोना रोखण्यासाठी जिल्हाधिकारी बोगस डॉक्टरांची मदत घेत असल्याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आरोप...
सोलापूर
● जिल्ह्यात सोमवारी एकाच दिवशी 2010 जण कोरोनामुक्त; 56 रुग्णांचा मृत्यू; 1332 नवीन बाधित... ● जिल्ह्यात 11 आणि 12 तारखेला सकाळी 7 ते 11 पर्यंत रमजान व अक्षयतृतीयेसाठी किराणा दुकानं आणि भाजीपाला विक्रीस परवानगी ... ● सोलापूर शहरातील 20 पेक्षा कमी बेड असणारे 13 हॉस्पीटलची कोविड सेवा पुरविण्याची मान्यता महापालिकेतर्फे रद्द... ● सोलापूर बाजार समितीचे माजी संचालक प्रवीण देशपांडे यांचे निधन... ● सोलापूरातील रुग्णालयाच्या ऑक्सिजन वापरावर ठेवा नियंत्रण; पालक सचिव दिनेश वाघमारेंच्या सूचना...
मुंबई
● लसीसाठी मागविणार जागतिक निविदा, ५० लाख लस खरेदीसाठी पालिकेची तयारी... ● म्युकाेरमायकोसिसच्या रुग्णांत वाढ, मुंबईत १२ जणांनी गमावला डाेळा; लवकर निदान झाल्यास उपचार सोपे... ● मुंबईकरांसाठी पुरेशा प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध व्हाव्यात यासाठी जागतिक पातळीवरून लस खरेदीची शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला देण्यात आल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली... ● इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईत कोरोना प्रसाराचा वेग कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. यात गेल्या २४ तासांत मुंबईत बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या नव्या रुग्णापेक्षा कमी जवळपास दुप्पट असल्याचे दिसून आले...
जालना
● जिल्ह्यात दिवसभरात 504 रुग्णांची कोरोनावर मात; 697 नवे रुग्ण आढळले तर उपचारादरम्यान 8 रुग्णांचा मृत्यू... ● अवैधरित्या विक्री केले जाणारे तब्बल 49 ऑक्सिजन सिलिंडर जप्त; जालन्यात अन्न व औषध विभागाची कारवाई... ● मंठा पोलिसांनी केला पावणेसहा लाख रुपयांचा अवैध दारूसाठा नष्ट... ● जालना जिल्ह्याच्या सीमेवर सर्व वाहनांची कसून तपासणी; अत्यावश्यक सेवा वगळता प्रवेश बंद ... ● जालना शहरातील लोधी मोहल्ला परिसरात रात्री उशिरा दोन गटात दगडफेक; पोलिसांनी हवेत गोळीबार करत घेतले 25 जणांना ताब्यात...
बीड
● जिल्ह्यात दिवसभरात 1295 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले... ● बीडमध्ये मराठा समाज आक्रमक; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची केली होळी... ● अवकाळीने धारुर तालुक्यातील उन्हाळी पिके उध्वस्त; तहसीलदार पंचनामा करण्यासाठी जहागीर मोहात... ● मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापकाने चावी न दिल्याने लसीकरणासाठी आलेले नागरिक ताटकळले... ● शेतातील नाली खोदण्याच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता पोलीस ठाण्याच्या आवारात फ्री स्टाइल हाणामारी...
औरंगाबाद
● जिल्ह्यात दिवसभरात 655 कोरोनाबधित रुग्णांची वाढ; 24 रुग्णांचा मृत्यू... ● केंद्राकडून मिळालेली 150 व्हेंटिलिटर बोगस; खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप ... ● जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट; अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे ... ● भारतीय अन्न महामंडळाची औरंगाबाद आणि अमरावती येथील विभागीय कार्यालये तातडीने कार्यान्वित होणार : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे... ● एकूण मिळालेल्या व्हेंटिलिटरचे योग्य नियोजन करून त्याचा डाटा तयार करा; आमदार अतुल सावे यांच्या प्रशासनाला सूचना... ● दिलासादायक ! रुग्णसंख्येत घट होत असल्याने शहरातील 10 कोविड सेंटर तात्पुरती बंद... ● हर्सूल सावंगी तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू...
अमरावती
● जिल्ह्यात दिवसभरात नवीन 1005 कोरोनाबाधित रुग्णसंख्या 76 हजार 440 वर ... ● बियाणे उपलब्धतेसाठी काटेकोर नियोजन करावे; कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज अमरावती विभागस्तरीय खरीप पिक नियोजन आढावा बैठकीत मांडले आपले मत... ● तिवसा शहरातील व तालुक्यातील नागरिकांना लसीचा लाभ देण्यात यावा; नगराध्यक्ष वैभव वानखेडे यांची प्रशासनाकडे मागणी... ● अचलपूर तालुक्यातील राशेगाव येथील तिघेजण अटकेत; वन विभागाच्या कारवाईत लाकडी फर्निचर व साहित्य करण्यात आले जप्त... ● बीडीएस प्रणाली सुरू करावी; शिक्षक समितीची प्रशासनाकडे मागणी... ● दुसऱ्या लाटेत अमरावती मध्यवर्ती कारागृहात कोरोना नियंत्रणात; फक्त चार कैदी आयसोलेटेड...
अकोला
● अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीन वर्षांचा सश्रम कारावास... ● जिल्ह्यातील एसटी बसची चाके थांबली; फेऱ्या रद्द; संचारबंदी काळात केवळ अत्यावश्यक सेवेसाठी १० ते ११ बसेस सुरू होत्या.... ● लॉकडाऊनला अकोलेकरांचा प्रतिसाद; पहिल्या दिवशी शुकशुकाट... ● सुरळीत विजेसाठी अकोला परिमंडलातील ३ हजार कर्मचारी कर्तव्यावर... जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...
@महालाईव्ह न्यूज
Comments